cm shinde amitabh bachchan esakal
मुंबई

Eknath Shinde: राज्यपालांनी केली अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना, उपमुख्यमंत्र्यांनी काढल्या चुका; मुख्यमंत्र्यांच्या चरित्राचे प्रकाशन

CM Shinde Biography: उदरनिर्वाहासाठी वेळप्रसंगी रिक्षा चालवणारे शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री ठरल्याचे प्रतिपादन आज राज्यपाल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.

सकाळ वृत्तसेवा

Thane : अभिनेता अमिताभ बच्चन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवन प्रवासात साधर्म्य आहे. अमिताभ यांनी ‘आनंद’ चित्रपटातून सुरुवात केली. नंतर अँग्री यंग मॅन बनून ‘जंजीर’, ‘दिवार’सारखे चित्रपट केले. शांत संयमी दिसणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात कोविड योद्ध्यासारखे काम केले, म्हणूनच सुरुवातीला दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे आणि उदरनिर्वाहासाठी वेळप्रसंगी रिक्षा चालवणारे शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री ठरल्याचे प्रतिपादन आज राज्यपाल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले.

राम गणेश गडकरी रंगायतन येथे बुधवारी (ता. ७) सायंकाळी प्रा. प्रदीप ढवळलिखित ‘योद्धा कर्मयोगी’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पद्मश्री डॉ. शंकर बाबा पापळकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते.

कपाळावर वैष्णवी टिळा, डोक्यावर नामदेवांची पगडी, उपरणे घालून मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पालखीमध्ये चरित्र ग्रंथ ठेवून, त्याची दिंडी व्यासपीठापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘योद्धा कर्मयोगी’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर पी. सी. राधाकृष्ण यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. यावेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत येऊन मला खूप आनंद झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला नसता तर आपली संस्कृती टिकली नसती. ते महान योद्धा होते. तसेच, भारतीय लोकशाही जगातील सर्वात बलवान लोकशाही असल्याचे सांगत ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. ते तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहेत. त्याचजोडीला महाराष्ट्राची आर्थिक स्थिती जपानपेक्षाही मोठी आहे. यावेळी शंकर बाबा पापळकर यांनीही दिव्यांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

हा तर केवळ ट्रेलर : मुख्यमंत्री

‘योद्धा कर्मयोगी’ हे पुस्तक माझा शेवट नाही. हा तर माझ्या आयुष्याचा केवळ ट्रेलर आहे. चित्रपट अजून बाकी आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दोन वर्षांपूर्वी सर्वसामान्य माणसाच्या गरजेतून आम्ही सत्ता सोडून एकत्र येत सत्ता स्थापन केली. आमचे काम बघून अजित पवार पण आमच्यासोबत आले. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रपणे राज्याच्या हितासाठी काम करत आहे आणि पुढेही करीन, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून दिली. हा सीएम म्हणजे ‘कॉमन मॅन’ असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या ‘चरित्रात’ उपमुख्यमंत्र्यांनी काढल्या चुका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. मात्र, या पुस्तकामध्ये काही चुका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले. पुस्तकात मुख्यमंत्र्यांच्या गावचा तालुका चुकला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निदर्शनास आणले. तसेच, या पुस्तकात नातवावर प्रेम करणारा आजोबा दिसला नाही, अशी खंतही व्यक्त केली. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचाही फोटो हवा होता, असे ते म्हणाले.

हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुस्तकातली एक चूक काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सागर बंगल्यावर झाल्याचा उल्लेख आहे. हा शपथविधी राजभवनात झाला असल्याचे ते म्हणाले. तसेच, पुस्तकाची पुढील आवृत्ती काढताना सहयोगी संपादक म्हणून अजित पवार यांना मदतीला घेण्याचा मिश्किल सल्लाही दिला.

...म्हणून मुख्यमंत्री नायक ठरतात

राजकारणात अनेक रेकॉर्ड होतात; पण सत्ता पक्षातून विरोधी पक्षासोबत पुन्हा सत्ता स्थापन म्हणून खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नायक ठरले आहेत. असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. छोट्याशा घरामध्ये राहणारे एकनाथ शिंदे एक दिवस वाळकेश्वर येथील वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचतील, असे वाटले नव्हते, असेही फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT