JJ Hospital Quarters esakal
मुंबई

JJ Hospital Quarters: जे. जे.ची डॉक्‍टरांसाठी आलिशान घरे, ८ नव्या इमारती; स्विमिंग पूल बागेचीही सुविधा

JJ Hospital Boosts Doctor Welfare with New Residential Facility : राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयाचा डॉक्टरांना आलिशान घरे देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : राज्य सरकारचे जे. जे. रुग्णालय डॉक्टरांना आलिशान घरे देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथल्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आलिशान घरे बांधली जाणार आहेत. रुग्णालय संकुलातील जुन्या इमारती पाडून आठ नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये वर्ग एक ते वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी फ्लॅट्स बांधण्यात येणार आहेत. नवीन इमारतीमध्ये पोडियम पार्किंग, स्विमिंग पूल आणि बागेसह इतर सुविधा असतील.

सरकारी रुग्णालयात राहण्याची चांगली व्यवस्‍था नसल्‍याची तक्रार डॉक्‍टरांसह वर्ग एक आणि चारच्या कर्मचाऱ्यांची नेहमीच असते. आपत्कालीन सेवेत रात्रंदिवस तैनात असून घरभाडे भत्ता देऊनही सुविधा मिळत नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. इमारती खूप जुन्या झाल्या असून खोल्याही छोट्या आणि अपुऱ्या आहेत. सरकारने आता जुन्या इमारती पाडून कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे चांगले टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

रुग्णालय परिसरात आठ नवीन टॉवर बांधण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे ७२८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची ‘ब्लू प्रिंट’ सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवली आहे. आता केंद्रीय एजन्सी ‘हाईट्स’ या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पाहाणार आहे.

जुनी आणि जीर्ण इमारत

जे. जे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, नोकरदार कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स जीर्ण झाले आहेत. घराबाहेर बांधलेल्या शौचालयात जावे लागते. वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. इतर इमारतींची स्थिती चांगली नाही. भिंतीवरून प्लॅस्टर पडणे, ड्रेनेज लाइन चॉकअप होणे, यासह अन्य समस्या आहेत. कर्मचाऱ्यांना राहण्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सरकारने ही योजना मंजूर केली आहे.

वर्ग एक, दोनच्या कर्मचाऱ्यांसाठी ३२ मजली इमारत

‘धनवंतरीत’ या इमारतीत वर्ग एक आणि दोनमधील डॉक्टर सध्या राहात आहेत. ही इमारत सुमारे ७० वर्षे जुनी आहे. सध्या या इमारतींमध्ये केवळ ३२ फ्लॅट आहेत. आता या इमारती पाडून तळघर असलेली २२ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीमध्ये ४० घरे तीन बीएचके (प्रति घर ११५२ चौरस फूट) आणि ११० घरे दोन बीएचके (८७२ चौरस फूट प्रति घर) असतील.

वर्ग तीनसाठी तीन इमारती

७० वर्षे जुन्या सहा ब्लॉकमध्ये तीन पोडियमसह ३४ मजल्यांच्या तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. या इमारतींमध्ये ६१२ घरे एक बीएचके फ्लॅट्स (प्रति घर ५१५ चौरस फूट) असतील. त्याच्या बांधकामासाठी अंदाजे २६४.५७ कोटी रुपये खर्च येणार आहे.

चौथ्या वर्गासाठी चार इमारती

३४ मजल्यांच्या चार इमारती बांधण्यात येणार असून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी तीन पोडियम बांधण्यात येणार आहेत. यात एक बीएचके परिसर असणारे ८१६ फ्लॅट्स (४४८ स्क्वेअर फूट) असतील. इमारत बांधण्यासाठी अंदाजे ३४८.५९ कोटी रुपये खर्च येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT