मुंबई

आरोपीस अटक

CD

बिगारी कामगारावर हल्‍ला
अंधेरी, ता.२७ (बातमीदार) ः मिस्त्री कामाची बॅग चोरी केल्याच्या संशयावरून सोनू हरिश्‍चंद्र तिवारी या ३२ वर्षांच्या बिगारी कामगारावर हल्ला केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. मनोज शिवनाथ सरोज असे या ४५ वर्षांच्या आरोपीचे नाव असून हल्ल्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला. त्याला पाच दिवसांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला बोरिवलीतील स्‍थानिक न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना सोमवारी (ता. १९) रात्री साडेबारा वाजता कांदिवलीतील एस. व्ही. रोड, पूर्विका शॉपीजवळील देना बँक सिग्नल फुटपाथवर घडली. सोनू हा बिगारी कामगार असून कांदिवली परिसरात राहतो. त्याचे घरात भांडण झाल्याने तो घर सोडून देना बँक सिग्नलजवळील फुटपाथवर राहत होता. तिथेच मनोज हादेखील राहतो. मनोज हा मिस्त्री काम करतो. त्याची मिस्त्री कामाची बॅग चोरीस गेली होती. ही बॅग सोनूने चोरी केल्याचा संशय व्यक्त करून त्याने त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी रागाच्या भरात त्याने सोनूवर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती.
रक्तबंबाळ झालेल्या सोनूला तिथेच टाकून तो पळून गेला होता. कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सोनूला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोनूच्या जबाबावरून पोलिसांनी मनोजविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
मनोज हा हल्ल्यानंतर त्याच्या उत्तर प्रदेशातील गावी पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत गिते, पोलिस उपनिरीक्षक दीपक पाटील, श्रीकांत मगर, नितीन साटम, मपोज गदळे आदींचे एक पथक उत्तर प्रदेशात पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मनोज सरोजला त्याच्या उत्तर प्रदेशातील गावातून शिताफीने ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT