मुंबई

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

CD

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

तारापूर, ता. २७ (बातमीदार) : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंगाची घटना ताजी असतानाच बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात सोमवारी (ता. २६) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एक नऊ वर्षीय अल्पवयीन मुलगी एका लहान मुलासोबत खेळत असताना आरोपी ४४ वर्षीय व्यक्तीने तिला दहा रुपयांचे प्रलोभन दाखवत एका बंद गाळ्यामध्ये नेत तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने जवळच कपडे धुवत असलेल्या तिच्या काकीने या गाळ्याकडे धाव घेतली. या वेळी एक व्यक्ती तिच्या अल्पवयीन पुतणीवर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. या महिलेला बघताच आरोपीने घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पळ काढला, मात्र महिलेने वेळीच आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी आरोपीला पकडून ठेवत बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र अहीरराव या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT