मुंबई

राज ठाकरे आज बदलापूरमध्ये

CD

राज ठाकरे आज बदलापूरमध्ये
गुन्हे दाखल झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट


बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासोबत बदलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी (ता. २८) बदलापूरमध्ये येणार आहेत.

चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २०) झालेल्या आंदोलनात दहा तास ‘रेल रोको’ आणि शाळेबाहेर झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनात तमाम बदलापूरकर सहभागी झाले. मात्र आंदोलन चिघळल्यानंतर हे आंदोलन थोपविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज, अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसांपासूनच आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली. काहींना या प्रकरणात अटक झाली; तर अटकेच्या भीतीपोटी काहींनी घरदार सोडले. त्यामुळे या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या घरातदेखील भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्था या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आहेत. या आंदोलनकर्त्यांशी व त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या (ता. २८) दुपारी १२ वाजता बदलापूर पश्चिम सानेवाडी येथील अदिती बँक्वेट हॉल या ठिकाणी येणार असून, आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

काय? आपल्या मुंबईत 'झोंबी' आलाय? रस्त्यावर तासनतास पुतळ्यासारखा वाकून उभा राहिला तरुण; लोक सुद्धा घाबरले! Viral Video

Latest Marathi News Live Update: पुण्यात पीएमपी बस ब्रेकडाउन वाढले; मार्चमध्ये १८००हून अधिक बस बंद, प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT