मुंबई

दहीहंडीच्या थरारात १०६ गोविंदा जखमी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२७ : दहीहंडी फोडण्याच्या उत्साहात थरावर उभे राहिलेले अनेक गोविंदा या वर्षीही जखमी झाले आहेत. पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमधून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण १०६ गोविंदा जखमी झाल्याची नोंद आहे. सायंकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्णालयांत १५ उपचाराधीन होते, तर ७४ जणांना घरी सोडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
पालिकेच्या केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी गोविंदांपैकी एकाच्या खांद्याला मार बसला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे ऑर्थोपेडिक विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले. दोघांना ऑर्थोपेडिक विभागासाठी दाखल केले होते. सोमवारी सरावादरम्यान एका गोविंदाला मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने केईएममध्ये दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या बऱ्याचशा गोविंदांना हातापायाला खरचटले आहे.
ॉदरम्यान, १०६ गोविंदांना पालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अॅडमिट करावे लागले आहे. १५ गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार केले गेले. सात गोविंदांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
...
एक गोविंदा ‘लीलावती’त
लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. निरज उत्तमानी म्हणाले, ‘वाकोला येथील गोविंदा पथकातील ३४ वर्षीय गोविंदाला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या सहकारी गोविंदांनी आम्हाला माहिती दिली. तो उंचावरून पडला, बेशुद्धावस्थेत आणि चालता येत नसल्याबद्दल खुद्द गोविंदानेही पुष्टी केली. त्याला मणक्याला दुखापत झाल्याचे आढळून आले. त्याचे पाय सुन्न झाले आहेत. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः------------------------------------
रुग्णालयांनुसार दाखल गोविंदा

जेजे रुग्णालय - २ डिस्चार्ज
सेंट जॉर्ज- ४ पैकी २ अॅडमीट. एकावर ओपीडीत उपचार सुरू , १ डिस्चार्ज
जी. टी. रुग्णालय - १ डिस्चार्ज
पोद्दार- १६ गोविंदांवर तत्काळ उपचार करून डिस्चार्ज दिला
केईएम १९ पैकी ५ जणांना दाखल केले. १४ जणांवर ओपीडीत उपचार
नायर रुग्णालय - ०८ पैकी १ अॅडमिट ७ डिस्चार्ज
सायन -११ गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार
राजावाडी रुग्णालय - ८ पैकी ३ जण अॅडमिट, ५ डिस्चार्ज
वीर सावरकर- ३ डिस्चार्ज
एमटी अग्रवाल - १ अॅडमिट
कुर्ला भाभा रुग्णालय- २ पैकी १ अॅडमिट, १ डिस्चार्ज
शताब्दी गोवंडी रुग्णालय - ६ डिस्चार्ज
वांद्रे भाभा रुग्णालय - तिघांवर ओपीडीत उपचार
ट्रॉमा केअर- ५ पैकी १ अॅडमिट ४ डिस्चार्ज
व्ही. एन. देसाई - चौघांवर ओपीडीत उपचार
एम डब्लू- ०१ डिस्चार्ज
लिलावती - ०१ अॅडमिट
कूपर - ०१ डिस्चार्ज
कांदिवली शताब्दी- १० जणांना डिस्चार्ज
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

SCROLL FOR NEXT