मुंबई

मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

CD

मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील कोलेटीवाडी येथील दामोदर बाळाराम ठाकूर (वय ५६, रा. कोलेटीवाडी, पो. पळस, ता. पेण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच गावातील भोय कुटुंबाने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दामोदर ठाकूर यांनी वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दामोदर बाळाराम ठाकूर यांच्या घरामध्ये पत्नी वैशाली ठाकूर (५२), मुलगा विजय ठाकूर (३२), त्याची पत्नी रेणुका ठाकूर (३०), त्यांची मुले अन्विता ठाकूर (पाच) व अथर्व ठाकूर (तीन), तसेच मुलगा अक्षय ठाकूर (२६), त्याची पत्नी सृष्टी ठाकूर असे एकत्रित कुटुंब आहे. मुलगा अक्षय ठाकूर याने याच गावातील शेजारी असणाऱ्या भोय कुटुंबातील मुलीशी प्रेमविवाह केल्याने त्यांच्या मनात असणारा राग आणि आमचे गावामध्ये जुने घर असून ते भोय यांच्या घराला लागूनच आहे. त्या जुन्या घराचे नव्याने बांधकाम करावयाचे असल्याने त्या सर्व गोष्टींचा राग मनात धरून दिलीप भोय व त्यांच्या अनेक नातेवाइकांनी लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्याविरोधात वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वडखळ पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

'आईने हातात पैसे दिले अन् म्हणाली ‘इथून निघून जा'; रवी किशन यांच्या आयुष्यातला धक्कादायक किस्सा

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला पाहिजे - आनंद दुबे

SCROLL FOR NEXT