पाणीटंचाईबाबत महिला आक्रमक
केडीएमसी मुख्यालयावर मडके मोर्चा
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : शहराच्या पश्चिमेतील काही भागात पाणी वितरणाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे; त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सोमवारी (ता. ३०) शेकडो महिलांनी पालिका मुख्यालयावर रिकामे माठ (घागर) घेऊन मोर्चा काढला. यावेळी महिलांनी मडके फोडून पालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध केला.
कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा, चिकणघर, काळा तलाव आदी भागांतील नागरिकांना पाणीटंचाई आणि दूषित पाणीपुरवठा समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणीसमस्येबाबत नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत; मात्र केवळ आश्वसनावर त्यांची बोळवण करण्यात येते. टंचाईच्या समस्येबाबत प्रशासनाकडून ठोस काहीच कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांनी आरोप केला आहे. ‘चिकणघर काळा तलावाचा सर्वांगीण विकास खुंटला, पाणी व रस्त्यासाठी जनतेचा उद्रेक मोर्चा’ असे फलक हातात घेत महिलांनी घोषणाबाजी केली. तसेच, हातातील मडके फोडून निषेध नोंदवला.
पाणीपट्टी उशिराने भरली तर थकीत बिलांवर व्याज लावले जाते; मात्र आम्हाला महिनोंमहिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या मोर्चानंतरही प्रशासनास जाग नाही आली व जलद योग्य कार्यवाही नाही केली तर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या केबिनमध्ये बसू दिले जाणार नाही.
- उमेश बोरगावकर, अध्यक्ष, व्यापारी रहिवासी संघटना, खडकपाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.