मुंबई

धारावी पुनर्वसन प्रकल्प कंपनी म्हाडा कार्यालयातून गाशा गुंडाळणार

CD

धारावी पुनर्वसन प्रकल्प कंपनी
म्हाडा कार्यालयातून गाशा गुंडाळणार
- किंग्ज सर्कल येथे स्थलांतर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : धारावी झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) या कंपनीचे कार्यालय कंपनीच्या स्थापनेपासून म्हाडाचे मुख्यालय असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आहे, पण डीआरपीने आता आपला येथील गाशा गुंडाळण्याची तयारी केली असून किंग्ज सर्कल येथील नव्या इमारतीत लवकरच हलवले जाणार आहे. त्यासाठी फायलींची आवराआवर सुरू आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीचे कार्यालय सध्या म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आहे. सदर कार्यालय घटस्थापनेच्या मुहूर्तावर किंग्ज सर्कल येथे हलवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षानुवर्षे अडगळीत असलेले हे कार्यालय धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून प्रकाशझोतात आले आहे.
सध्याच्या धारावीत सुरू असलेले सर्वेक्षण, नंबरिंग आदी कामे सुरू झाली असून त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय अपुरे पडत आहे. त्यामुळे हे कार्यालय किंग्ज सर्कल षण्मुखानंद हॉल येथील एका तीन मजली भव्य इमारतीत हलविण्यात येणार आहे. या नवीन वास्तूचे पितृपक्षपूर्वी गणेशपूजनही उरकून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. पितृपक्ष संपल्यावर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी नवीन कार्यालयात कामकाज सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT