मुंबई

कल्याण पश्चिमसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आग्रही

CD

कल्याण पश्चिमसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आग्रही
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभेची जागा महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाला सोडावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश माजी सचिव नोवेल साळवे यांनी केली आहे. कल्याण पश्चिमेतील शासकीय विश्रामगृहात नोवेल साळवे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ, तसेच संपूर्ण कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळे नागरिकांना विनाकारण कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच, येथील लोकसंख्या वाढत आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी नसल्याने आजपर्यंत नागरिकांना ज्या सुविधा मिळाव्यात, त्या सुविधा मिळू शकल्या नाहीत. महापालिकेने रुक्मिणीबाई रुग्णालयात मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या; मात्र या रुग्णालयाचे खासगीकरण केल्याचे दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनावेळी रस्त्यांची दुरवस्था होते. जनतेच्या कष्टाचा पैसा दरवर्षी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून खर्च केला जातो; पण रस्ते तसेच आहेत, त्यांची सुधारणा होणे गरजेचे आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने संधी दिल्यास येथील रस्त्यांवर कधीही खड्डे पडणार नाहीत. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे आपली निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे साळवे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT