मुंबई

गर्भवतीच्या पोटातून काढला दीड किलोचा गोळा

CD

गर्भवतीच्या पोटातून काढला दीड किलोचा गोळा
डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आई-बाळाला जीवनदान
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : गर्भवतीच्या पोटात वाढलेला मांसाचा गोळा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. ही महिला गर्भवती असल्याने गोळा बाहेर काढताना गर्भातील बाळाला इजा पोहचण्याचा धोका होता; मात्र उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तृप्ती रोकडे यांच्या पथकाने कौशल्य पणाला लावत गर्भवतीच्या पोटातून दीड किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढला. तसेच, आई व बाळाला जीवनदान देण्याचा करिश्मा केला आहे. या अत्यंत धोकादायक आणि जटिल अशा या शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांचे कौतुक करण्यात येत आहे.

बदलापूर आणि मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका गर्भवती महिलेच्या पोटात दीड किलोचा मांसाचा गोळा आढळला होता. गर्भवती असल्यामुळे तिच्यावर कोणतेही सामान्य उपचार शक्य नव्हते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने शासकीय रुग्णालयातच उपचार घेण्याचे ठरवले; मात्र पोटातील गोळा आणि बाळाची स्थिती अत्यंत गंभीर आणि धोकादायक होती. स्थानिक रुग्णालयांत या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ते वैद्यकीय साधनसामग्री नसल्यामुळे तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले.

शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या शस्त्रक्रियेला डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत नियोजनपूर्वक आणि काळजीपूर्वक हाताळले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तृप्ती रोकडे, डॉ. नम्रता कुलकर्णी, डॉ. हनुमंत डोईफोडे आणि भूलतज्ज्ञ अमोल शेटे यांनी एकत्रितपणे शस्त्रक्रिया करत दीड किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढला. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेदरम्यान तिची प्रसूतीही सुरक्षित पार पडली. या यशस्वी शस्त्रक्रियेचे श्रेय फक्त डॉक्टरांबरोबरच या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही जाते. इन्चार्ज राखी कुलकर्णी, स्टाफ नर्सेस आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांनीही अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

शस्त्रक्रियेनंतर महिला आणि तिचे बाळ दोघेही पूर्णतः सुरक्षित आहेत. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले आहेत. कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
- डॉ. मनोहर बनसोडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

Pune Satara Highway Traffic: सलग सुट्ट्यांचा फटका: पुणे-सातारा महामार्गावर नसरापूर-कापुरहोळदरम्यान सहा किमीपर्यंत भीषण वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT