मुंबई

बदलापूर अत्याचार प्रकरण

CD

बदलापूर अत्याचार प्रकरण
----
चौकशी अहवाल
तातडीने सादर करा
उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणाची दंडाधिकाऱ्यांमार्फत लवकरात लवकर चौकशी करा आणि १८ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ३) राज्य सरकारला दिले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. अक्षयने एका पोलिसाची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला; मात्र अक्षयची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी अ‍ॅड. अमित कटारनवरे, अ‍ॅड. पूजा डोंगरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी शवविच्छेदन अहवाल आणि इतर कागदपत्रे दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, आरोपी ज्या ग्लास किंवा बाटलीतून पाणी प्यायला होता, तो एक महत्त्वाचा पुरावा असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आणि त्यावरील बोटांचे ठसे घेतले आणि तपासले गेले का, याची चौकशी खंडपीठाने केली. त्यावर न्यायालयाने जारी केलेल्या निर्देशांचे पोलिसांनी पालन केल्याचे सराफ यांनी सांगितले.
---
बंदुकीची फायरिंग पिन ठरणार निर्णायक
पोलिस कर्मचाऱ्याला झालेल्या दुखापतीमध्ये कोणताही रिकोशेट पॅटर्न नाही आणि तपासादरम्यान एकूण चार गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत, असे महाधिवक्ता सराफ यांनी सांगितले. दोन वेगवेगळ्या बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्याने बंदुकीची फायरिंग पिन निर्णायक पुरावा म्हणून काम करू शकतो, असे न्यायाधीश म्हणाले. या युक्तिवादानंतर खंडपीठाने ही सुनावणी १८ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father dies after daughter wedding : मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर बाप झिजला अन् पाठवणीनंतर जगातून कायमचा निघून गेला... पन्हाळा तालुक्यात हळहळ

Cabbage-Cucumber Sandwich: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट उपाय! बनवा एकदम फ्रेश आणि हेल्दी कोबी-काकडी-अ‍ॅव्हकाडो सँडविच

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ज्यांनी ‘ई-केवायसी’ केली नाही, त्यांना मिळणार एक महिन्याची मुदत?; दुरुस्तीची आज संपणार मुदत, मे महिन्यात मिळणार ३००० रुपये

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

SCROLL FOR NEXT