कासा (बातमीदार)ः डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील रानशेत वळणावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एसटी आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही; पण वाहनांचे नुकसान झाले आहे. बोईसर आगाराची भुसावळकडे निघालेली बस रानशेत येथील एका वळणावर रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कारने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ४० प्रवासी सुरक्षित आहेत. तर, कारमधील पाच जण थोडक्यात बचावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.