‘डीआरपी’ने थकवले म्हाडाचे भाडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राज्य सरकारने स्थापन केलेल्या धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे (डीआरपी)ने म्हाडाचे तब्बल २५ कोटी रुपयांचे भाडे थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील ‘डीआरपी’चे हे कार्यालय माटुंगा येथे स्थलांतरित केले जाणार आहे. आता थकलेल्या भाडे वसुलीसाठी म्हाडाने ‘डीआरपी’ला नोटीस बजावली आहे.
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कार्यालय म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या पाचव्या मजल्यावर आहे. कक्ष क्र. ६१९ मध्ये असलेल्या सुमारे सात हजार चौरस फुटाच्या या प्रशस्त कार्यालयासाठी म्हाडा दरमहा २६५ रुपये प्रति चौरस फूट दराने भाडे आकारते; मात्र ‘डीआरपी’ने या कार्यालयाचे भाडे वर्षानुवर्षे थकवले आहे. त्यातच त्यावरील व्याजाच्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबरअखेर थकीत भाडे आणि व्याजाची रक्कम मिळून ‘डीआरपी’ने पंचवीस कोटी रुपये भाडे थकवल्याचे समोर आली आहे. हे थकीत भाडे पंधरा दिवसांत भरण्याबाबत म्हाडाने डीआरपीला नोटीस बजावली आहे. डीआरपी कार्यालयातील स्वच्छतागृह, विद्युतपुरवठा, इमारत आणि कार्यालयाची देखभाल, साफसफाई, पाणीपुरवठा, सुरक्षा रक्षक अशा सोयी-सुविधा म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे पुरवल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.