मुंबई

मुलुंड नाल्यावरील पुलाचे काम रखडले

CD

मुलुंड नाल्यावरील पुलाचे काम रखडले
दीड किलोमीटर पायपीट; रहिवाशांचा पालिकेशी पत्रव्यवहार
मुलुंड, ता. ९ (बातमीदार) ः पूर्वेतील जयहिंद कॉलनी आणि नानेपाडा परिसरातील नाल्यावरील पादचारी पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. परिणामी नागरिकांना एक ते दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत.
विशेष म्हणजे मुलुंड पूर्व परिसरातील हा ४० ते ५० वर्षे जुना नाला असून या नाल्यालगत अनेक मोठमोठ्या लोकवस्त्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी त्या वेळी पालिकेकडून या ठिकाणी एक पादचारी पूल बांधण्यात आला होता, मात्र या पादचारी पुलाची अनेक वर्षे डागडुजी न झाल्याने या पुलाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे पालिकेने हा पूल दीड वर्षापूर्वी पाडून त्‍या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू केले, मात्र गेल्या दीड वर्षात केवळ १० ते २० टक्केच काम पालिकेने पूर्ण केले आहे.
पालिकेने या ठिकाणी केवळ लोखंडी सळ्या लावून या पुलाच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर दीड वर्षापासून काम असेच रखडले आहे. याबाबत स्थानिकांनी अनेकदा पालिकेच्या संबंधित विभागासोबत पत्रव्यवहार केला, मात्र पालिकेकडून अद्याप त्‍याची दखल घेतली नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे जय हिंद कॉलनी आणि नानेपाडा परिसरातील हजारो नागरिक या पुलावरून मार्गक्रमण करतात. त्‍याशिवाय या परिसरात अनेक महाविद्यालये आणि पालिकेच्या शाळादेखील आहेत. त्यामुळे या शाळकरी विद्यार्थ्यांनादेखील या पुलाच्या अपूर्ण कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर पाच मिनिटांच्या अंतरासाठी नागरिकांना १० ते १५ मिनिटांचा वेळ वाया घालवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ हा पूल तयार करावा, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. अन्यथा आम्ही जोरदार आंदोलन करू, असा संतप्त इशारादेखील नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT