मुंबई

शेकडो मशालींनी उजळला प्रतापगड

CD

पोलादपूर, ता. ९ (बातमीदार) ः किल्ले प्रतापगडावरील आई भवानीच्या स्थापनेस या वर्षी ३६५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त मंगळवारी (ता. ८) रात्री गडावर ३६५ मशाली प्रज्वलित करून महोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने साक्षात आई
भवानीच्या स्थापनेमुळे पुनित झालेल्या हिंदवी स्वराज्यातील एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे प्रतापगड. महाराजांची भोरप्याच्या डोंगरातील तट बुरुजांचे शेला पागोटे चढवून स्वराज्यावर चालून आलेल्या उन्मत अफझलखानाचा येथेच वध केला होता. या स्फूर्तिदायक घटनेने इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली. हा भीमपराक्रम जिच्या कृपाशीर्वादाने प्रत्यक्षात आला तिचे स्मरण म्हणून छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर आई भवानीचे मंदिर बांधून आदिशक्तीची स्थापना केली.
प्रतापगडनिवासिनी आई जगदंबेच्या स्थापनेला २०१० मध्ये ३५० वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून प्रतापगडावरील स्थानिक शिवभक्त आप्पासाहेब उतेकर यांच्या कल्पनेतून गडावर ३५० मशाली प्रज्वलित करून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी हा मशाल महोत्सव साजरा करण्यात येतो. राज्‍यभरातील असंख्य शिवभक्त महोत्सवात सहभागी होण्यासाठी आवर्जून येतात.
मंगळवारी रात्री ३६५ मशालींनी किल्‍ले प्रतापगड उजळून निघाला होता. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. भवानी मातेची विधिवत पूजा संपन्न झाल्‍यावर रात्री नऊनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमले, रायगड जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, प्रतापगड मशाल महोत्सव समितीचे प्रमुख चंद्रकांत (आप्पा) उतेकर यांच्या हस्ते मशाली पेटवून महोत्सवाला प्रारंभ झाला. भाविक मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.

शिव जयघोषाने दुमदुमला गड
प्रतापगडावरील सर्व मंदिरांभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रज्वलित मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता. ढोल-ताशांचा गजर, आणि शिव जयघोषाने गड दुमदुमला होता. मशालींमुळे उजळून निघालेला गड पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मशाल महोत्सव समितीकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलादपूर ः मशालींमुळे प्रतापगड उजळून निघाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : बटबटित वंगचित्रे

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

SCROLL FOR NEXT