प्राधान्य गटातील विजेत्यांना तत्काळ मिळणार घर
म्हाडाकडून लवकरच कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : म्हाडाच्या कोकण मंडळाने १२ हजारांहून अधिक घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली होती. त्यापैकी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या गटातील अर्जदारांना घर देण्याची प्रक्रिया म्हाडाकडून लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे विधानसभा आचारसंहितेच्या काळात घर मिळणार का, या चिंतेत असलेल्या संबंधित अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईसह एमएमआर परिसरात हक्काचे घर असावे, हे सर्वसामान्यांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केले जातात. त्याची दखल घेत म्हाडाने ठाणे, विरार-बोळिंज, कल्याण आदी ठिकाणच्या जवळपास ११ हजार १७६ घरांचा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या गटात समावेश केला आहे. या घरांसाठी सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या १० दिवसांत सुमारे ३,९५५ अर्ज आले असून ३,२१९ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. ४५३ जण प्राथमिक स्तरावर घरांसाठी पात्र झाले असून संबंधितांना म्हाडा आता पात्र झाल्याचे कळवणार आहे. त्यानंतर संबंधितांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डोमिसाईलचा दाखला ही कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पात्रता अंतिम होणार आहे. त्यानंतर त्यांना २५ टक्के रक्कम भरण्यासाठी तीन महिन्यांची नोटीस दिली जाणार आहे. ही रक्कम भरल्यानंतर संबंधिताला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी एनओसी दिली जाणार असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
...
पैसे भरले की ताबा
राज्यात सध्या सुरू असलेल्या अचारसंहितेमुळे म्हाडाची लाॅटरी काढता येत नाही; मात्र प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या गटातील घरे देण्याच्या प्रक्रियेमध्ये आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही. संबंधित अर्जदारांनी घराची रक्कम भरल्यानंतर त्यांना विनाविलंब सदनिका देणे शक्य होणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.