मुंबई

श्रीवर्धन- अलिबाग गाडीला अखेरीस ग्रीन सिग्नल

CD

श्रीवर्धन-अलिबाग गाडीला अखेरीस ग्रीन सिग्नल
उत्पन्न कमी असल्याचे सबब देत २०१८ ला केली होती बंद
श्रीवर्धन, ता. ३१ (बातमीदार)ः एसटी महामंडळाकडून बंद केलेली श्रीवर्धन- अलिबाग गाडीला अखेरीस ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्‍यामुळे अलिबाग मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
श्रीवर्धन आगाराची स्थापना १९८७ रोजी झाली. स्थापनेनंतर आगाराकडून मुंबई शहरापासून तळकोकणापर्यंत तर अनेक स्थानिक फेऱ्या सुरू करण्यात आल्या. प्रशासकीय कार्यालयांचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग येथे ही अनेक वर्षे नियमित वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणारी व आर्थिक उत्पन्नात अग्रेसर असणारी अलिबाग गाडी २०१८ रोजी अचानक बंद करण्यात आली. महत्त्वाची कार्यालये अलिबाग येथे असल्याने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील शासकीय कर्मचारी व शासकीय कार्यालयात वैयक्तिक कामे असणाऱ्या नागरिकांना अलिबाग एसटी उपयुक्त होती. १९८७ ते २०१८ रोजीपर्यंत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी गाडी अशी ख्याती असणारी अलिबाग एसटी आर्थिक उत्पन्न कमी असल्याचे सबब देत बंद करण्यात आली. प्रवासीवर्गाने मागणी केल्यावर समाधानासाठी काही दिवसांसाठी सदरची गाडी सुरू करण्यात आली होती, मात्र ती कायमची बंद करण्यात आली. त्‍यानंतर शिवसेना (शिंदे गट) श्रीवर्धन शहर संघटना पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची भेट घेत प्रवाशांच्या सेवेसाठी श्रीवर्धन-अलिबाग एसटी बस सुरू करावी, अशी विनंती करण्यात आली होती. प्रवासीवर्गाची दखल घेत श्रीवर्धन-अलिबाग गाडीला अखेरीस ग्रीन सिग्नल मिळाला आहे. श्रीवर्धन येथून मार्गस्थ होण्याची वेळ सकाळी साडेपाच तर अलिबाग येथून परतीची वेळ सायंकाळी साडेचार आहे. गाडीचा जाण्या-येण्याचा मार्ग म्हसळा, माणगाव, वडखळ असा आहे.
======≠≠===========================================================================================
अलिबागची होती वाट बिकट
श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासीवर्गाला अलिबाग येथे जाण्यासाठी पहाटेची मुंबई किंवा कल्याण गाडीने वडखळ गाठने व पुढे अलिबागला परतीच्या वेळेस वडखळ, माणगाव, म्हसळा टप्पे करीत श्रीवर्धन असा त्रासदायक प्रवास करावा लागत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार, वार करत खून; अज्ञात मारेकऱ्यांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ..

Latest Marathi News Live Update : एकाच घरात दोन पक्ष; चंद्रपुरात पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक रिंगणात

Arvind Sawant : "त्यांना डॉबरमॅन म्हणायचे की मांजर?" अरविंद सावंतांचा सुधाकर बडगुजर यांना बोचरा सवाल

Marathwada Crime : मोबाइल घेण्यावरून वाद! आधी सिगारेटचे चटके दिले आणि नंतर चिरला गळा; चौघांवर गुन्हा, संशयिताला अटक

T20 World Cup 2026 : भारतात खेळा नाही तर...! ICC चा बांगलादेशला थेट इशारा, 'ती' मागणीही फेटाळली

SCROLL FOR NEXT