मुंबई

ठाण्यात रविवारी प्रचार रॅलीचा धडाका

CD

ठाण्यात रविवारी प्रचार रॅलीचा धडाका
मुख्यमंत्र्यांसह सर्व उमेदवारांनी केले संधीचे सोने
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिवाळीनंतर आलेल्या पहिल्याच रविवारी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनी दारोदारी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत रविवारच्या सुटीच्या संधीचे सोने केले, तर काहींनी रॅली काढून प्रचाराचा धुरळा उडवला. या वेळी प्रत्येक उमेदवारांनी मतांचा जोगावा मागितला. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्रीही मागे नव्हते. ठाणे शहर, कोपरी पाचपाखडी, मुंब्रा-कळवा, ओवळा-माजिवडा यांच्यासह कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दिवा शहरात सकाळपासून सुरू झालेला प्रचार रात्री १० वाजेपर्यंत सुरू होता.

येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांपासून पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात व्यग्र आहेत. समाजमाध्यम, मॉर्निंग वॉक, तसेच प्रचार रॅलीवर उमेदवार विशेषकरून भर देत आहेत. त्यातच दिवाळीनंतर आलेल्या १० आणि १७ नोव्हेंबर हे दोन रविवार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या प्रत्येक उमेदवारासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावली आहे. सुटी असल्याने रॅली आणि उमेदवारांना मतदारांकडून प्रतिसादही मिळाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली दुपारी रामनगर आयटीआय येथून सुरू झाली, तर रॅलीचा समारोप गांधीनगर शाखा येथे झाला, तसेच केदार दिघे यांची प्रचार रॅली माता मंदिर येथून सुरू झाली. त्या रॅलीची आंबेवाडी येथे सांगता झाली, तर ठाणे शहरात विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या रॅलीचा कचराळी तलाव येथे समारोप झाला, तर राजन विचारे यांची रॅली बाळ हनुमान मंदिर येथून सुरू होऊन चंद्रनगर मैदान येथे सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

SCROLL FOR NEXT