शिक्षण क्रांती संघटनेची निवडणूक आयोगाकडे मागणी
भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : सद्यस्थितीत राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या बुधवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मतदानाच्या राष्ट्रीय कामावर व्यस्त आहेत. अशातच मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामावर पुन्हा रुजू व्हावे लागते; परंतु देशाच्या निवडणूक आयोगाने मतदानाच्या दुसऱ्या दिवशी अशा कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस, राज्य पुरस्कारप्राप्त मनोज महाजन व ठाणे महानगर अध्यक्ष किशोर राठोड यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसाठी मतदानाच्या एका दिवसापूर्वी मतदान केंद्रावर हजर राहावे लागते, त्यानंतर मतदानासंबंधी कार्यवाही करावी लागते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान कर्मचारी व अधिकाऱ्यांना थांबावे लागते. यानंतर पूर्ण सोपस्कार पार पडल्यानंतर मतपेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या लागतात. हे काम उशिरापर्यंत चालते. त्यामुळे कर्मचारी रात्री उशिरा घरी जातात. अशा वेळी दुसऱ्या दिवशी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुट्टी अत्यावश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सुट्टी देण्यात यावी. तसे ते पत्र जिल्हा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना व त्या त्या विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांना निर्गमित करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
- सुधीर घागस, राज्याध्यक्ष, शिक्षण क्रांती संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.