कार्यकर्त्यांचा उत्साह उमेदवाराच्या जीवावर
फटाक्याच्या ठिणगीमुळे केसाला आग
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर रविवारी (ता. १७) सर्वच उमेदवारांनी जोर दिला. कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे; मात्र काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह हा नेत्यांच्या जीवावर बेतताना दिसत आहे. कल्याण पश्चिम विधानसभेतील ‘जिजाऊ’चे उमेदवार राकेश मुथा यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्याने फटाके फोडले. या फटाक्याच्या ठिणगीमुळे मुथा यांचे केस जळता-जळता वाचले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे.
राकेश मुथा रविवारी रात्री उशिरा प्रचार करत होते. भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी दीडशे किलो वजनाचा भव्य हार तयार केला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला; मात्र हारासोबत लावलेल्या इलेक्ट्रिक स्पार्कर्सवर फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्याला लागली. या कारणाने त्यांच्या केसांनी पेट घेतला; मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आग नियंत्रणात आली. यानंतरही राकेश मुथा कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहिले. त्यांच्या हावभावामुळे त्यांना अधिक दुखापत झालेली नसल्याचे दिसून आले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांच्या अतिरेकाचा उत्साह हा धोका निर्माण करू शकतो, हेच या घटनेवरून दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.