मुंबई

मेट्रो आज मध्यरात्रीपर्यंत धावणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचाऱ्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये, म्हणून महामुंबई मेट्रोने बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून मध्यरात्री एकपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे, यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) २० नोव्हेंबर रोजी मेट्रोसेवेची वेळ वाढवल्याची घोषणा केली आहे. मतदानाच्या दिवशी प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो सेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होणार आहे. बुधवारी (ता. २०) पहाटे पहिली मेट्रो चार वाजता गुंदवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) स्थानकांवरून सुटेल. तर, गुरुवारी (ता. २१) मध्यरात्री शेवटची मेट्रो एक वाजता सुटेल.
-----------------------------------------
२० जादा फेऱ्यांचे नियोजन
एमएमआरसीएलने बीकेसी-आरे मार्गावर बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून मध्यरात्री म्हणजे गुरुवारी रात्री एक वाजेपर्यंत दैनंदिन फेऱ्यांच्या तुलनेत १९ अतिरिक्त फेऱ्या २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जाणार आहेत. त्यानुसार २० जादा फेऱ्या असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT