मुंबई

सायन स्थानकात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

CD

सायन स्थानकात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
प्रवाशांना त्रास
धारावी, ता. २४ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील सायन स्थानकात गेल्‍या अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. त्‍यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
स्थानकातील फलाट क्रमांक एक ते चारवर जवळपास सात ते आठ भटक्या कुत्र्यांचा कळप फलाटावर निर्धास्तपणे हिंडत असतो. अनेकदा हे कुत्रे एकमेकांवर जोरजोरात भुंकत असतात. या कुत्र्यांमध्ये भांडणे सुरू असतात. यामुळे हे कुत्रे हिंसक होतात. अनेकदा प्रवाशांच्या हातातील साहित्य खेचून घेतात.
बेसावध प्रवाशांच्या हातातील साहित्य अनेकदा खेचून कुत्रे पळून जातात. धावत्या लोकल सोबत धावतात. त्‍यामुळे दरवाजावर उभे राहून प्रवास करणारे प्रवासी घाबरून जातात. फलाट क्रमांक तीन व चारवरून जलद लोकल धावतात. या फलाटावरून जाणाऱ्या लोकलसोबत धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकदा दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडते. त्‍यामुळे एखाद्या प्रवाशाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे भटके कुत्रे फलाटावरच झोपून असतात. त्‍यामुळे प्रवाशांना फलाटावर उभ्या असलेल्या व लोकल गाडीतून उतरणाऱ्या प्रवाशांना कुत्र्यांपासून सावधपणे जावे लागत आहे. एखाद्या प्रवाशाचा चुकून कुत्र्याला पाय लागल्‍यास झोपलेले कुत्रे प्रवाशांना चावा घेण्याचा प्रयत्न करतात. फलाटावर लहान मुले, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर महिला प्रवास करतात. भटक्या कुत्र्यांच्या मोकाट वावरामुळे प्रवाशांना मुठीत जीव घेऊन भीतीने प्रवास करावा लागत आहे.
स्थानकातील भटक्या कुत्र्यांना काही प्रवासी व श्वानप्रेमी खाद्यपदार्थ देत असल्याने अनेक भटके कुत्रे स्थानकात घुटमळत असतात. त्‍यामुळे कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या गंभीर बनत चाललेल्या समस्येकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Marathi News Live Updates : आमच्या नोंदी सापडल्या म्हणून आरक्षण मागतोय- मनोज जरांगे

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

SCROLL FOR NEXT