महायुतीच्या विजयानंतर शिक्षक संघटनांमध्ये उत्साह
मुंबई, ता. २४ ः विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला आणि विशेषत: भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजपप्रणीत भाजप शिक्षक आघाडी, शिक्षक परिषदेसह मुख्याध्यापक आणि प्राध्यापक संघटनांमध्ये जल्लोष केला जात आहे. संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भाजप नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.
राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि त्यासोबतच भाजप शिक्षक आघाडीचा शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ (एबीआरएसएम) तसेच मुंबई युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर असोसिएशन (मुक्टा) प्राध्यापक संघटनेचा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा दबदबा आहे. या निवडणुकीत शिक्षक आणि प्राध्यापक संघटनांनी मागील असंख्य निवडणुकांप्रमाणे आपली भूमिका चोख बजावली. यामुळे भाजप आणि एकूण महायुतीच्या यशाच्या वाट्यात आपलेही योगदान असल्याचे सांगत संघटनांमध्ये मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. मुक्टाचे सरचिटणीस प्रा. सुभाष आठवले यांनी राज्यात महायुतीला मिळालेल्या यशात शिक्षक, प्राध्यापक संघटनांचे मोठे योगदान राहिले असून या बदलामुळे एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे एबीआरएसएमचे मुंबई विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठल सोनटक्के यांनीही या निकालाचे स्वागत करत उच्च शिक्षणातील आमच्या संघटनेकडून वेळोवेळी समोर आणले जाणारे विषय आणि त्यासाठीचे निर्णय यापुढे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
...
प्रश्नांची सोडवणूक होईल!
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच, शालेय शिक्षणातील विविध प्रश्नांची यापुढेही सोडवणूक होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील प्रमुख पदाधिकारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत त्यांचे अभिनंदन केले असून त्याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजयाचे साक्षीदार बनलेल्या भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी आणि सदस्यही मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. दरम्यान, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या उत्तर मुंबईचे अध्यक्ष व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन आपण त्यांचे अभिनंदन केल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.