मुंबई

वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

CD

वेळेवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांंच्याकडून मराठी शाळांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : मराठी शाळांची पटसंख्या वाढविणे त्याचबरोबर विनापरवानगी रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करावी तसेच वेळेत शाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शिक्षण विभाग अधिकाऱ्यांना दिल्या. सोमवारी (ता.२) आयुक्त डॉ. जाखड यांनी महापालिकेच्या मराठी शाळांची पाहणी केली. या वेळी आढळून आलेल्या त्रुटींवर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी महापालिकेच्या शाळा क्रमांक ३३ धाकटे शहाड, शाळा क्रमांक ६३ मिलिंद नगर, शाळा क्रमांक ६८ बारावे या तीन शाळांना भेटी दिल्या. याभेटींदरम्यान शाळा इमारत, वर्गखोल्या, दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा तसेच शाळा परिसराची त्यांनी तपशीलवार पाहणी केली. शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी वर्ग सुरू असताना संवाद साधला. या वेळी त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सुविधांविषयी चर्चा केली. या वेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT