मुंबई

जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त एफ. जी. नाईक महाविद्यालयातर्फे रॅली

CD

जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त एफ. जी. नाईक महाविद्यालयातर्फे रॅली
नवी मुंबई (वार्ताहर) : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण संस्थेच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या माध्यमातून पोस्टर मेकिंग आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा एड्स नियंत्रण विभागांतर्गत आयसीटीसी नागरी आरोग्य केंद्राच्या रमा शिंदे (समुपदेशक), जब्बार शेख (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक उपस्थित होते. समाजामध्ये एड्सबद्दल असलेले अज्ञान दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करून समाजातील हे अज्ञान दूर करावे, असे आवाहन प्राचार्य महाडिक यांनी या वेळी केले, तर रमा शिंदे यांनी मार्गदर्शन करताना आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थी हा आजच्या समाजजीवनाचा महत्त्वाचा घटक असल्याने विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेऊन समाजामध्ये एड्ससारख्या रोगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले तसेच निरोगी समाज घडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. एड्स जनजागृती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर महाविद्यालयात पोस्टर मेकिंग स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. यात प्रथम क्रमांक सानिया मयेकर, द्वितीय निर्जला गुफ्ता तसेच तृतीय क्रमांक ओमकार देशमुख या विद्यार्थ्यांनी पटकावले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. दत्तात्रय घोडके, राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे प्रमुख प्रमोद साळुंखे तसेच प्रा. डॉ. कविता पवार, एनएसएस कमिटी मेंबर प्रा. चिन्मय वैद्य, प्रा. प्राजक्ता सावंत आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT