मुंबई

एकाच कुटुंबातील १० जणांना विषबाधा

CD

एकाच कुटुंबातील १० जणांना विषबाधा
दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; अंधश्रद्धेतून उपचारास नकार

बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : सोनीवली येथील आदिवासीपाड्यात एकाच कुटुंबातील १० जणांना विषबाधा झाल्याने आपल्यावर कोणी तरी करणी केल्याच्या अंधश्रद्धेतून एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. यानंतर एका साडेचार वर्षांच्या मुलीचीही प्रकृती चिंताजनक आहे. या कुटुंबाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सुरुवातीला नकार दिला; मात्र या वेळी स्थानिक आशा सेविकेच्या प्रयत्नाने या कुटुंबातील इतरांचे प्राण वाचल्याची बाब समोर आली आहे.

बदलापूर पश्चिम सोनीवली परिसरातील आदिवासीपाड्यात गौऱ्या मिरकुटे हे ४५ वर्षीय गृहस्थ आपल्या कुटुंबासोबत राहतात. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. मिरकुटे यांच्या कुटुंबात त्यांच्या दोन पत्नी, सात मुले आणि एक बहीण असे ११ जण राहतात. या कुटुंबातील लहान मुलांना गुरुवारी (ता. ५) सकळी अचानक उलट्या आणि अतिसराचा त्रास होऊ लागला. त्यानंतर घरातील मोठ्यांनादेखील पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यातच सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मिरकुटे यांची दोन वर्षांची मुलगी सपनाचा घरातच मृत्यू झाला. ही बाब परिसरातील नागरिकांनी स्थानिक आशा सेविका ममता मेहेर यांनी सांगितली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र मिरकुटे कुटुंबीयांनी आमच्यावर कोणीतरी करणी केल्याने आम्हाला हा त्रास होत असल्याचे सांगून वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला.

ममता मेहेर यांनी दोन तास या कुटुंबाचे समुपदेशन करीत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिकेतून मिरकुटे कुटुंबातील १० जणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये साडेचार वर्षांची भारती मिरकुटे हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये राज मिरकुटे, वैशाली मिरकुटे, गणेश मिरकुटे, मयूर मिरकुटे, कल्पना मिरकुटे, गोदी मिरकुटे हे उपचार घेत असून, गौऱ्या मिरकुटे हे बरे असून ते घरी परतले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडल्यानंतर आशा सेविका वेळेत येऊन त्यांनी उपचार मिळवून दिल्याचे सांगितले.

..
आशा सेविका बनल्या देवदूत
कुळगांव बदलापूर पालिकेच्या आशा सेविका ममता मेहेर यांना या विषबाधेची माहिती मिळताच त्यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मिरकुटे यांच्या घरी धाव घेतली. या वेळी त्यांच्या घरात दोन वर्षांची मुलगी मृत अवस्थेत त्यांना आढळून आली, तर साडेचार वर्षांच्या मुलीसह इतर कुटुंबीय गंभीर होते. अंधश्रद्धेला बळी पडलेल्या या कुटुंबाचे मेहेर यांनी योग्य समुपदेशन करीत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT