मुंबई

धारावीतील स्काय वॉक खाली कचरा

CD

धारावीतील स्कायवॉकखाली कचरा
धारावी, ता. ११ (बातमीदार) : धारावीतून माहीमच्या दिशेला जाण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारण्यात आला आहे. धारावीतील मुख्य रस्त्यावरील स्कायवॉकखाली मोकळ्या जागेत गेल्या काही दिवसांपासून कचरा साचला आहे, तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आपले सामान व साहित्य ठेवण्यासाठी या जागेचा वापर सुरू केला आहे.

धारावीतून माहीम स्थानकाकडे, तसेच माहीम पश्चिमेला जाण्यासाठी एमएमआरडीएतर्फे स्कायवॉक उभारला आहे. या स्कायवॉकखाली मोकळ्या जागेत रोपटी लावली होती, तसेच त्याची रंगरंगोटी करून सौंदर्यीकरण केले होते; मात्र मोकळ्या जागेतील सौंदर्यीकरण काही दिवसच टिकले. सध्या या मोकळ्या जागेत रोपट्यांच्या जागी कचरा व टाकाऊ साहित्य पडलेले आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे, तसेच दुर्गंधी पसरलेली आहे. स्कायवॉकच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पादचारी व स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. यामुळे स्कायवॉकला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्कायवॉक माहीम रेल्वे स्थानकापर्यंत जोडला जावा, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. स्कायवॉक माहीम स्थानकाला जोडला नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. माहीम स्थानकातून धारावीतील हजारो प्रवासी प्रवास करतात; मात्र स्कायवॉक अर्धवट असल्याने प्रवाशांना स्कायवॉकचा फायदा होत नव्हता. धारावीतून माहीम स्थानकाकडे जाण्यासाठी स्थानिकांना ६० फुटी संत कबीर मार्ग ओलांडून जावे लागत होते. यामुळे नऊ वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारला होता. स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दुकानदारांचा स्कायवॉक जोडणीला विरोध होत होता. त्याला न जुमानता स्कायवॉक स्थानकाला जोडला गेल्याने प्रवासी व पादचारी समाधान व्यक्त करत होते. धारावीतून माहीम पश्चिमेला असलेल्या अनेक शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व पालकांची सोय झाल्याने विद्यार्थी व पालक आनंद व्यक्त करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT