मुंबई

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मुदतवाढ

CD

वाशी, ता. ११ (बातमीदार)ः ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ याअंतर्गत २६ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेने आतापर्यंत एक लाख अर्जांचा टप्पा गाठला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता सिडकोने ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी २६ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोने महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता जवळपास २६ हजार सदनिकांची विक्री केली जाणार आहे. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प.), खारघर (पू.) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमधील सदनिका परवडणाऱ्या दरात घेण्याची संधी असल्याने या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक अर्ज नोंदणी झाली असल्याने वाढता प्रतिसाद पाहता २६ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच, नोंदणीसाठी बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र, १०० किंवा ५०० रुपयांच्या मूल्याच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अटही शिथिल केली आहे.
-----------------------------------
नोंदणीसाठीचे संकेतस्थळ
महागृहनिर्माण योजनेची ईकेवायसी नोंदणी २६ डिसेंबर २०२४ पर्यंत आहे. यासाठी सिडकोतर्फे cidcohomes.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून नोंदणी प्रक्रिया तथा योजनेविषयी अतिरिक्त माहिती प्राप्त करण्यासाठी ९९३०८७०००० हा संपर्क क्रमांक दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT