मुंबई

बदलापुरात ग्रामीण रुग्णालयात रुग्णाशी उद्धटपणा

CD

बदलापुरात ग्रामीण रुग्णालयात रुग्णाशी उद्धटपणा
डॉक्टरकडून रुग्णालय बंद करण्याची धमकी; राष्ट्रवादी आक्रमक

बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात सोमवारी (ता. ६) सकाळी उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका रुग्णाला येथील डॉक्टरने चुपचाप उभा राहा, नाहीतर रुग्णालय बंद करून टाकेन, अशी धमकी देत अपमान केला. याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. ७) सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत रुग्णाशी उद्धटपणे वागणाऱ्या डॉक्टरला समज देण्यासाठी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योत्स्ना सावंत यांची भेट घेतली, तसेच त्यांना कुलूप व चावी देत रुग्णालय बंद करून दाखवा, अशा भाषेत थेट खडसावले.

सोमवारी सकाळी बदलापूर पूर्वेकडील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी झाली होती. याच वेळी राजेश्वर ढेकण हे आपल्या सात वर्षांच्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आले होते. गर्दी व गोंधळ होत असल्याने गर्दीच्या नियोजनाठी राजेश्वर ढेकण यांनी येथील सुरक्षा रक्षकाला पाचारण केले; मात्र या वेळी सेवा बजावत असलेल्या डॉ. शौन नंदुरकर यांनी राजेश्वर यांचा अपमान केला, तसेच तू चुपचाप उभा राहा नाहीतर हे रुग्णालय मी बंद करेल, अशा उद्धट भाषेत उत्तर दिले. या वेळी डॉक्टरांना कोणतेही प्रत्युत्तर न देता याबाबत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्याकडे डॉ. शौन यांची तक्रारदेखील केली; मात्र या वेळी वैद्यकीय अधीक्षक सावंत यांनीदेखील ही बाब तितक्या गांभीर्याने घेतली नाही. त्यानंतर या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी घेतली. या प्रकारानंतर अविनाश देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन इथल्या अधीक्षकांना कुलूप आणि चावी देत तुमच्या डॉक्टरांमध्ये जर हिंमत असेल, तर सर्वसामान्यांचे हक्काचे सरकारी रुग्णालय बंद करून दाखवा, असा इशारा दिला. त्याचबरोबर रुग्णांसोबत उद्धट बोलून त्यांचा अपमान करणाऱ्या संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अविनाश देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्ही संबंधित डॉक्टरांना याबाबत समज दिल्याचे सांगितले.

कारवाईची मागणी
बदलापुरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय हे एकमेव सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात बदलापूर, अंबरनाथ, वांगणी आणि येथील आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण पट्ट्यातील अनेक गोरगरीब नागरिक उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नसल्याने ग्रामीण रुग्णालयात रोज रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशावेळी, सरकारी सेवक, आरोग्य कर्मचारी म्हणून डॉक्टर किंवा डॉक्टरेतर कर्मचारी यांनी रुग्णांशी सलोख्याने वागणे आवश्यक आहे; मात्र अनेकदा सरकारी रुग्णालयात हेच डॉक्टर रुग्णांशी उद्धटपणे वागून त्यांचा अपमान करतात. असाच प्रकार बदलापुरातदेखील पाहायला मिळाला. या वेळी निदान अपमानास्पद वागणूक दिल्याची जाणीव झाल्यानंतर तरी संबंधित डॉक्टरने रुग्णाची माफी मागायला हवी होती, अशी मागणी बदलापूरकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Yavatmal Diesel Supply : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ट्रॅक्टरच्या टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोल पंपांना थेट आदेश

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT