वायू विद्युत प्रकल्पाकडे अधिकारीवर्गाचे दुर्लक्ष
मनसेचा आरोप; नादुरुस्त बॉयलर, टरबाइन बदलण्याची मागणी
उरण, ता. ७ (बातमीदार) ः उरण तालुक्यात गॅसवर चालणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प हा एकमेव सरकारी उपक्रम आहे. या प्रकल्पातील सहा संचांतून ६७२ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र अधिकारीवर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या वीजनिर्मिती कमी होत असून, हा वायू विद्युत प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. यामुळे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकल्पाची पाहाणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
देशातील पहिला नैसर्गिक वायूपासून वीजनिर्मिती करणारा वायू विद्युत केंद्र प्रकल्प उरण तालुक्यात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची स्थापना १९८३-८४ मध्ये करण्यात आली. संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वायू विद्युत केंद्राची स्थापित क्षमता ९५२ मेगावॉट आहे. या प्रकल्पातील सहा संचांतून ६७२ मेगावॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकते. मात्र मागील काही वर्षांत गॅसपासून वीजनिर्मिती करणाऱ्या संचाची कार्यक्षमता येथील अधिकारीवर्गाच्या दुर्लक्षिततेमुळे कमी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच या वीजनिर्मिती प्रकल्पात ९ ऑक्टोबर २०२२ रोजी मोठा स्फोट होऊन एका अभियंत्यासह दोन कामगार होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यानंतरदेखील मुख्य अभियंता प्रकल्पातील नादुरुस्त बॉयलर आणि एका स्टीम टरबाइनकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसेचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केला आहे.
............
प्रतिक्रिया
वायू विद्युत केंद्रातील नादुरुस्त असलेल्या ब्लॉक ए मधील दोन बॉयलर आणि स्टीम टरबाइनकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे आरोप चुकीचे व आधारहीन आहेत. या टरबाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. जसा गॅस येतो त्याप्रमाणे वीजनिर्मिती होते. दोन वर्षांपूर्वी अपघात झाला ते पंप वेगळे होते. त्याचा या पंपाशी कोणताही संबंध नाही.
- मोहन आव्हाड, मुख्य अभियंता, वायू विद्युत प्रकल्प
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.