मुंबई

महापालिकेच्या कॅन्सर सेंटरमध्ये पहिली केमोथेरपी

CD

नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : नेरूळ येथील नवी मुंबई महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात कॅन्सरग्रस्तांसाठी १० खाटांचे डे केअर केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये शुक्रवारी (ता. १७) पहिल्यांदाच एका रुग्णावर केमोथेरपी करण्यात आली आणि या सेंटरमध्ये प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशांना कॅन्सरसंबंधित उपचारांकरिता खासगी रुग्णालयांमध्ये अथवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारार्थ जावे लागते. त्यामुळे अनेकदा रहिवाशांची अडचण होते. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कॅन्सर रुग्णांकरिता अत्यंत महत्त्वाची केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी आयुक्त डॉ. कैलास शिंदे आग्रही होते. त्याअनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने गतिमान पावले उचलत टाटा ॲक्ट्रेक यांच्या समन्वयातून महापालिकेच्या नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात १० खाटांचे डे केअर केमोथेरपी युनिट सुरू करण्यात आले आहे. डे केअर सेंटर सकाळी आठ वाजल्यापासून कार्यान्वित राहणार आहे. रुग्णांवरील उपचारासाठी येथे फिजिशियन, स्टाफ, नर्स व आवश्यकतेनुसार इतर विशेषतज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत.
------------
पहिला डोस टाटा ॲक्ट्रेकमध्ये
डे केअर सेंटर सुरू करण्यासाठी कॅन्सर उपचारासंबंधित सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना खारघर येथील टाटा ॲक्ट्रेक येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. सॉलिड ट्युमरच्या रुग्णांवर या डे केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. या उपचाराने निदान व केमोथेरपीचा पहिला डोस टाटा ॲक्ट्रेक येथे देण्यात येईल व रुग्ण हायमोडायनॅमिकली स्टेबल असल्यास व ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची आवश्यकता नसेल अशा नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांना केमोथेरपीच्या दुसऱ्या डोसपासून या डे केअर सेंटरमध्ये उपचार दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT