मुंबई

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले आवश्यक

CD

पालघर, ता. १६ (बातमीदार) : आपले सरकार पर्यटनवाढीसाठी लहान व मोठ्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर भर देत आहे. विशेषतः इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचे संरक्षण व विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तेव्हा पालघर जिल्ह्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात केली आहे.
पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे भूतकाळातील संस्कृती, कला आणि वास्तुशैलीचे प्रतिबिंब दर्शवतात. परंतु, येथील किल्ल्यांच्या संरक्षणाची व विकासाची नितांत आवश्यकता आहे, असे सवरा यांनी अधिवेशनात सांगितले. या किल्ल्यांवर पिण्याचे पाणी, शौचालय, कॅफेटेरिया आणि इतर नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. योग्य सुविधा निर्माण केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत पालघर जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या किल्ल्यांची दुरवस्था आणि नागरी सुविधांच्या अभावाबाबत प्रश्न उपस्थित केला. या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली

ऐतिहासिक स्थळे
पालघर जिल्ह्यात वसई किल्ला, अर्नाळा किल्ला, शिरगाव किल्ला, अशेरी किल्ला, केळवा किल्ला, भोपतगड, कोहोच किल्ला, तांदूळवाडी, तारापूर, महालक्ष्मी, गंभीर गड, वज्रगड, डहाणू किल्ला, मांडवी किल्ला, काळदुर्ग आणि टकमक किल्ला यांसारखी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

Video Viral: जसप्रीत बुमराह हा जलदगती गोलंदाजांमधला उस्मान तारिक; फेकाड्या पाकिस्तानी गोलंदाजासोबत जस्सीची बरोबरी

वागळे की दुनिया फेम भारती आचरेकरांचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण ! ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेचा प्रोमो चर्चेत

काव्या मारनने एवढ्या आनंदाने अबरार अहमदला संघात घेतले; पाकड्यांनी दाखवली लायकी, The Hundred मधून घेऊ शकतो माघार...

Love-Jihad: आता धर्म बदलणं कठीण होणार, लव्ह जिहाद करणाऱ्यांना शिक्षा मिळणार; महाराष्ट्र सरकारकडून विधेयक सादर

SCROLL FOR NEXT