मुंबई

पालिकेच्‍या ‘पर्यावरण संसद’ उपक्रमाचे आमदाराकडून कौतुक

CD

पालिकेच्‍या ‘पर्यावरण संसद’ उपक्रमाचे आमदारांकडून कौतुक
खारघर, ता. १५ (बातमीदार) : शाळा आणि महाविद्यालयील विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण होण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद असून, विद्यार्थांनी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करावे, असा उपदेश आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थांना दिला.
शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थांना माझी वसुंधरा अभियानअंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्त्व पटवून देण्यासाठी खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये नुकतेच पर्यावरण संसदचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पर्यावरण जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच संसदेमध्ये कायदे कशा प्रकारे मंजूर केले जातात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संसदेत ज्या प्रकारे कायदे पास होतात, त्याप्रमाणे या पर्यावरणीय संसदेत पर्यावरणाशी संबंधित आठ प्रस्ताव या वेळी मांडण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणीय समस्यांवर आधारित आपली मते मांडून शाश्वत उपयुक्त ठरणारे प्रस्ताव सादर केले. यामध्ये जलसंधारण, प्रदूषण नियंत्रण, हरित ऊर्जा, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन या महत्त्वाच्या मुद्द्यावर या वेळी चर्चा करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी माझी वसुंधराची शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Horoscop : उद्या 6 मार्चला 'या' 6 राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी खुशखबर; आर्थिक लाभ संभवतो, नात्याला मिळेल नवी दिशा

SCROLL FOR NEXT