मुंबई

घराच्या बदल्यात धारावीतच हवे घर!

CD

घराच्या बदल्यात धारावीतच हवे घर!
धारावी बचाव आंदोलन समितीची आज धारावीत सभा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत धारावीचा कायापालट केला जाणार असून, त्याचे सर्वेक्षण सुरू होऊन वर्ष होत आले, तरीही धारावीचा मास्टर प्लान काय आहे, याबाबत धारावीकर अंधारात आहेत. त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पाने (डीआरपी) धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लान जाहीर करावा, घराच्या बदल्यात धारावीतच ५०० चौरस फुटांचे घर मिळावे, याबरोबरच दबाव, दादागिरी आणि सरकारची अदाणीला खुली सूट, याविरोधात आपला आवाज बुलंद करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन समिती आक्रमक झाली असून, उद्या सोमवारी (ता. १६) धारावीत जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्रत्येकाला घराच्या बदल्यात घर द्यावे, पात्र-अपात्रतेचा खेळ करू नये, धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लान काय आहे, तो जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने धारावीकर करत आहेत, मात्र त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने धारावी बचाव आंदोलन समितीनकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याबाबत आपला आवाज बुलंद करतानाच सरकारसह आदाणीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजता अभ्युदय बँकेसमोर, धारावी मेन रोड, धारावी येथे जाहीर सेभेचे आयोजन करण्यात आल्याचे धारावी बचाव आंदोलन समितीचे समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या?
- धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लान जाहीर करा.
- घराच्या बदल्यात ५०० चौरस फुटांचे घर आणि दुकानाच्या बदल्यात धारावीतच मोफत दुकान मिळाले पाहिजे.
- मनपा इस्टेट डिपार्टमेंट (मालमत्ता विभाग)च्या चाळी आणि इमारतीतील घरांच्या बदल्यात ७५३ चौरस फुटांपर्यंतची घरे मोफत द्या.
- कमर्शियल गाळ्यांच्या बदल्यात त्यांच्या वापरात आहे तेवढी जागा मोफत द्या.
- कुंभारवाड्याचे पुनर्वसन धारावीतच करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

Gudi Padwa Special Sugar-Free Dates Shrikhand: गुढी पाडव्याला मधुमेहीदेखील खाऊ शकतील श्रीखंड; खजूर श्रीखंडाची रेसिपी लगेच वाचा

SCROLL FOR NEXT