मुंबई

रक्तदाब, शुगरपासून कामगारांच्या सुटकेसाठी माझा लढा : संजय केळकर

CD

कामगारांच्या शुगरपासून सुटकेसाठी माझा लढा
संजय केळकर कर्मचारी हृदयसम्राट पुरस्काराने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : विविध आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब, शुगर यासारखे आजार जडले आहेत. या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेली अनेक वर्षे मी कामगारांच्या न्याय-हक्कासाठी झटत आहे. हजारो कामगारांच्या वतीने मला दिलेल्या कर्मचारी हृदयसम्राट पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव मला आहे, अशा शब्दांत आमदार संजय केळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्या.

कंपनी कामगार, ठाणे महापालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा, भत्ते, पदोन्नत्या, भविष्य निर्वाह निधी, सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न, अशा अनेक आघाड्यांवर न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महापालिकेतील पाच कर्मचारी संघटनांच्या वतीने महाजनवाडी हॉल, खारकर आळी, ठाणे येथे आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदयसम्राट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना केळकर बोलत होते.

२००६ ला विधान परिषदेचा आमदार, २०१४ पासून विधानसभेचा सलग तीन टर्म आमदार या काळात आणि त्याही आधीपासून वंचित घटक असलेले बूट पॉलिश कामगार, तसेच कंपनी कामगार आणि महापालिका कामगारांसाठी काम करत आहे. मी कामगारांचा नेता म्हणून कधीच काम केले नाही, तर कामगार मित्र म्हणून त्यांच्या समस्या निर्मूलनासाठी आजवर लढत आलो. बंद पडलेल्या कंपन्यांचे कामगार देशोधडीला लागले, वर्षानुवर्षे थकबाकीपासून वंचित राहिले. पोयशा, मफतलालसारख्या अनेक कंपन्यांच्या हजारो कामगारांसाठी लढे दिले. त्यांना मिळत असलेल्या न्याय हक्कांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, त्याचे मला मोठे समाधान मिळते. जनतेने मला दिलेले आमदार हे घटनात्मक पद सर्वसामान्य जनता आणि कामगारांच्या न्याय हक्कांसाठी वापरणे हे मी माझे ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी कामगारांशी संवाद साधताना केले.

ठाणे महापालिका कर्मचारीवर्गातर्फे दत्ता घुगे आणि अजित मोरे हे मुख्य आयोजक होते, तर या भव्य आयोजन समितीत क्रांती संघटना (ठाणे महापालिका) अध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटना (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष लक्ष्मण पुरी, वाहनचालक संघटना (ठाणे महापालिका) हरिश्चंद्र देशमुख, महाराष्ट्र म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, धर्मवीर आरोग्य कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज परब यांचा समावेश होता. संघटनांच्या प्रमुखांनी आमदार संजय केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

केळकर प्रत्येकाच्या घरातील आमदार- डावखरे
सर्वसामान्य नागरिक असो, कामगार असो, कोणीही असो, त्याचा फोन आमदार संजय केळकर घेतात, त्याच्याशी बोलतात. त्यामुळे लोकांना ते त्यांच्या घरातीलच आमदार वाटतात. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना ते शांत-संयमी भूमिकेतून वाटाघाटी करतात. अडवणूक होत असेल, तर ते रुद्रावतारदेखील घेतात. स्वच्छ प्रतिमा असल्याने अधिकारी वर्गात त्यांचा चांगलाच दबदबा आहे, अशा शब्दांत प्रमुख अतिथी आमदार निरंजन डावखरे यांनी केळकर यांच्या कामाचा गौरव केला. या वेळी ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील, महेश कदम, डॉ. अमोल गीते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT