महामार्गाच्या रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल
वाहनचालकांना उन्हाचा तडाखा; स्थानिकांकडून वृक्षलागवडीची मागणी
कर्जत, ता. १८ (बातमीदार) ः शहापूर, मुरबाड, कर्जत आणि खालापूर परिसरात लावलेली झाडे नष्ट करण्यात आली असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नव्याने झाडे लावण्याची मागणी स्थानिक नागरिक व दासभक्तांकडून होत आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात येणार होती, परंतु प्रत्यक्षात त्या झाडांचा कोणताही ठावठिकाणा अद्याप दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रायगड, ठाणे जिल्ह्यात रस्त्याच्या दुतर्फा तसेच डोंगर भागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. काही ठिकाणी ती झाडे मोठी झाली असून, त्या त्या भागात सावली निर्माण झाली आहे. याच धर्तीवर श्री सदस्यांकडून कर्जत-मुरबाड हायवेच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली होती. २०१८-१९ दरम्यान लावलेल्या शेकडो झाडांसाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांना क्रमांक देऊन त्यांची जोपासना करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र येथील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने या झाडांची कत्तल केली. या महामार्गाच्या शहापूर, मुरबाड, कर्जत आणि खालापूर परिसरात लावलेली झाडे नष्ट करण्यात आली असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नव्याने झाडे लावण्याची मागणी स्थानिक नागरिक व दासभक्तांकडून होत आहे. विशेष म्हणजे महामार्गाच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यात येणार होती, परंतु प्रत्यक्षात त्या झाडांचा कोणताही ठावठिकाणा अद्याप दिसून येत नाही. सध्या पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, त्यामुळे निसर्गावर विपरीत परिणाम होत आहे. वाढते औद्योगिक प्रदूषण, उष्णतेत होणारी वाढ, ओला दुष्काळ, गारपीट, वादळे, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढताना दिसत आहे. याशिवाय झाडांची कमी झालेली संख्या पशुपक्ष्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण करती आहे. रस्त्याचे रुंदीकरण आणि विकास महत्त्वाचे असले तरी झाडांची जोपासना होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने महामार्गाच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये नवीन झाडे लावण्याचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी नागरिकांची आणि पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नव्या झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करणे हे प्रशासनाचे नैतिक कर्तव्य असल्याचे बोलले जात आहे.
..................
चौकट
सदस्यांच्या मेहनतीवर पाणी
रस्त्याच्या रुंदीकरणाच्या प्रक्रियेत शेकडो झाडे तोडली गेली आहेत. मात्र त्यांची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दासभक्तांनी कष्टाने ही झाडे लावली होती; मात्र ती उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. प्रशासनाने झाडे तोडून विकली असली तरी रस्ता पूर्ण झाल्यानंतर नवीन झाडे लावण्याचा कोणताही स्पष्ट आदेश देण्यात आलेला नाही. येत्या १ मार्चपासून नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात शहरी वस्तीत स्वच्छता अभियानसुद्धा राबविण्यात येणार आहे.
.................
रुजू होण्यापूर्वी झालेल्या या प्रकाराबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल. विकासकामांसाठी झाडे तोडली असतील तर पुढील काळात संबंधित विभागाकडून झाडांची लागवड करून घेण्यात येईल.
-प्रदीप चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी, कर्जत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.