मुंबई

भरारी पथकच लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

CD

मनोर, ता. १८ (बातमीदार) : अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कारवाईसाठी कार्यरत असलेले महसूल विभागाचे भरारी पथक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. मंगळवारी (ता. १८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शिरसाड-वज्रेश्वरी रस्त्यावर मांडवी भागात भरारी पथकातील दोन पोलिस कर्मचारी आणि एका खासगी व्यक्तीला ५० हजारांची रक्कम घेताना लाचलुचपत विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पालघर जिल्ह्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागअंतर्गत खनिकर्म विभागाच्या अखत्यारीत जिल्हा स्तरावर भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून शुल्क निरीक्षक मारोती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक कार्यरत आहे. या पथकाने सोमवारी (ता. १७) सायंकाळी वज्रेश्वरी-शिरसाड रस्त्यावर खडी नेणारा ट्रक थांबवून वाहतूक परवाना नसल्याने दंडात्मक कारवाईचा अहवाल तयार करून ट्रक मांडवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्यानंतर पथकातील दोन पोलिस कर्मचारी आणि खासगी व्यक्तीने रस्त्यावरून खडी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक थांबवून वाहतूक परवाना नसल्याने दंडात्मक कारवाई केली जाईल, असे तिघांकडून ट्रकमालकाला सांगण्यात आले. ही कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांच्या लाचेचा प्रस्ताव ट्रकमालकाला देण्यात आला. त्याने दोन लाख रुपये देण्याची तयारी असल्याचे सांगत पालघरच्या लाचलुचपत विभागाला माहिती दिली.

पहाटेच्या वेळी कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ५० हजारांची रोख रक्कम घेताना भरारी पथकातील पोलिस कर्मचारी दत्ता शिंदे, श्रीराम डाखुरे आणि खासगी व्यक्ती तृणाल धनु याला ताब्यात घेतले. या वेळी भरारी पथक प्रमुख मारोती सूर्यवंशी उपस्थित नव्हते. ही कारवाई पालघर जिल्हा लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी हर्षल चव्हाण यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT