मुंबई

झाडांची कत्तल रोखण्यासाठी नागरिक आक्रमक

CD

झाडांची कत्तल रोखण्यासाठी नागरिक आक्रमक
उल्हासनगर, ता १९ (वार्ताहर) : शहरातील वृक्षतोड आणि पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर उल्हासनगर महापालिका प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. व्हिनस चौक, कलानी सोसायटी परिसरातील गार्डन हटवल्यानंतर आता महापालिका येथील हिरवेगार झाडे तोडण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिनस चौक परिसरात पूर्वी असलेल्या गार्डनची जागा रिकामी केली होती. आता त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या मोठ्या झाडांची तोड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. झाडांचे संरक्षण करण्याऐवजी नगररचना विभाग आणि इतर प्रशासकीय यंत्रणा विकसकांच्या मागण्या पूर्ण करण्यात व्यग्र असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सार्वजनिक हिताच्या कामांसाठी नागरिकांना पालिकेच्या फेऱ्या माराव्या लागतात; मात्र विकसकांना झटपट परवानग्या दिल्या जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणात उल्हासनगर महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. करदात्यांच्या पैशातून महापालिका अधिकाऱ्यांना वेतन मिळत असताना, त्यांची निष्ठा फक्त बिल्डरच्या सोयीसाठी आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करून झाडांची तोड थांबवण्याची मागणी केली आहे. झाडांची तोड थांबवली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. प्रशासनाने या झाडांचे स्थलांतर करून पुनर्लागवड करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र यापूर्वी अनेक ठिकाणी झाडे तोडल्यावर पुनर्लागवडीच्या दाव्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नागरिक या निर्णयावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.


लढा सुरूच राहणार
पर्यावरण वाचवण्यासाठी संपूर्ण देशभरात प्रयत्न सुरू आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाचा वृक्षतोडीबाबतचा निष्काळजी दृष्टिकोन धक्कादायक आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाविरोधात तीव्र आक्षेप घेतला आहे. महापालिकेने तातडीने निर्णय बदलावा अन्यथा मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. उल्हासनगर महापालिकेने या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करावी. पर्यावरणाच्या संतुलनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT