इराणी कॅफे, बेकऱ्यांचा
ऐतिहासिक वारसा जपा
माजी नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : लाकूड भट्टी वापरणाऱ्या व्यावसायिक भोजनालयांना मुंबई महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत; मात्र जुना पाककृती इतिहास जपण्यासाठी लाकूड भट्टी वापरणाऱ्या इराणी कॅफे, बेकऱ्यांना ऐतिहासिक वारशाचा दर्जा द्यावा, अशी मागणी कुलाब्याचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
लाकूड आणि कोळशावरील भट्टीवर बंदी लागू केल्यास वडापावसाठी आवश्यक असलेल्या पावाच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होईल, असे इराणी बेकर्स असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे, याकडे नार्वेकर यांनी लक्ष वेधले आहे. तसेच या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित इराणी कॅफे आणि बेकऱ्यांवर होणार आहे. त्यांचे शहराच्या खाद्य संस्कृतीत ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. येथील कॅफे आणि बेकरी एका शतकाहून अधिक काळापासून मुंबईत अस्तित्वात असून, ते वापरत असलेल्या लाकूड भट्ट्या यांना ऐतिहासिक महत्त्व असून इराणी कॅफे हे मुंबईच्या पाककृतीचा समृद्ध वारसा आहे. या कॅफेंचे मूळ एकोणिसाव्या शतकात असून, झोरास्ट्रियन इराणी स्थलांतरितांनी त्यांच्या पाककृती परंपरा मुंबईत आणल्या. त्यामुळे लाकूड आणि कोळशावरील भट्ट्यांना सूट देऊन या पाककृतींची चव राखावी, असे नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.