गव्हाणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले. त्यांनी फक्त रयतेचाच विचार केला. त्यामुळे सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत, असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उलवा नोड येथे आज (ता. १९) केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा गव्हाण-कोपर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी रामशेठ ठाकूर बोलत होते.
उलवा नोडमधील सेक्टर १२मधील प्लॉट क्रमांक सहा येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलजवळील मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या रामशेठ ठाकूर मैदानाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते झाले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, समितीचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अश्वारूढ पुतळ्याच्या आरक्षित जागेसाठी महेंद्र घरत तसेच इतर सहकाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले, म्हणूनच लवकर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आकारास येईल आणि त्याअनुषंगाने गव्हाणजवळ लवकरच शिवसृष्टी उभी राहील, असे रामशेठ ठाकूर यांनी या वेळी सांगितले. या शिवजयंती उत्सवात ओवी देशमुख, स्वरा ठाकूर, त्रियांश मोकल या चिमुकल्यांनी शिवरायांवर केलेल्या भाषणाने आणि उलवा वॉरियर्स ग्रुपने लाठीकाठी, तलवारबाजीच्या कसरतीने मान्यवरांची मने जिंकली. अंगावर रोमांच उभे राहिले. या वेळी बालकलाकारांनी सादर केलेल्या अभूतपूर्व कलेला प्रोत्साहन म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २० हजार रुपये बक्षीस दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.