मुंबई

जेवणाच्या वादातून मैत्रिणीची आत्महत्या

CD

जेवणाच्या वादातून मैत्रिणीची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : स्वयंपाक बनविणे तसेच मित्राच्या कपड्यावर तेलाचे डाग पडल्याच्या कारणावरून दोघा मित्र-मैत्रिणींचा वाद झाला. यावरून रागाच्या भरात मैत्रिणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. १७) घडली. मानसी संतोष नवघने (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. मानसीच्या ३० वर्षीय नोकरदार मित्राने दिलेल्या माहितीनुसार, टिळकनगर पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
टिळकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकुर्लीजवळील खंबाळपाडा परिसरात मानसी आणि तिचा ३० वर्षीय मित्र लिव्ह इन रिलेनशिपमध्ये राहत होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. जेवण बनविण्यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. यात मित्राने बाहेरून जेवण घेतले, त्या जेवणाचे डाग त्याच्या कपड्याला लागले होते. यावरून त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. याच रागाच्या भरात मानसीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मित्राच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्याने तिला तातडीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मानसीचा मृतदेह तपासणीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दिला. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT