मुंबई

अनधिकृत बॅनरबाजी वाढली

CD

अनधिकृत बॅनरबाजी वाढली
कांदिवली परिसराचे विद्रूपीकरण; कारवाईकडे दुर्लक्ष
कांदिवली, ता. २५ (बातमीदार) : शहरात अनधिकृत बॅनरबाजी वाढली असून, पालिकेचा यामुळे महसूल बुडत आहे. परिसराचे विद्रूपीकरण झाल्‍याने कांदिवली परिसरात पालिकेने केलेले सुशोभीकरण वाया गेल्‍याची तक्रार नागरिक करीत आहेत.
कांदिवली पूर्व आणि पश्चिमेला पालिकेने लाखो रुपये खर्च करून चौकांचे सुशोभीकरण केले आहे. या चौकांचे तसेच परिसराचे बॅनरबाजीमुळे विद्रूपीकरण झाले आहे. राजकीय पक्ष, नेते, सामाजिक मंडळे मिळेल त्‍या जागेवर बॅनर लावतात. यासाठी कुणाचीही परवानगी घेतली जात नाही.
कोट्यवधी रुपये खर्च करून पालिका दुभाजक, महत्त्वाचे चौक आणि मार्गांचे सुशोभीकरण केले आहे. मात्र विविध कार्यक्रम, वाढदिवसांचे बॅनर लावण्यात येत असल्‍याने पालिकेने केलेले सुशोभीकरण झाकोळले गेले आहे.
सुशोभीकरण केलेले चौक, सार्वजनिक शौचालय, स्कायवॉक आणि दुभाजकांमध्ये चक्क शोभेची झाडे तोडून बांबूचा ढाचा बांधून बॅनर लावण्यात येतात. कांदिवली पूर्व लोखंडवाला येथील विश्वकर्मण्य चौक, पश्चिमेत एस. व्ही. रोडवरील जीवनदास मटाणी चौक, एम. जी. रोडवरील अक्षर पुरुष चौक या परिसरात तर मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात येते. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
अनधिकृत, धोकादायक बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले होते; तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्‍याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

फक्त आचारसंहितेच्या काळात परिसर बॅनरमुक्त असतो. इतरवेळी सर्वच ठिकाणी बॅनर दिसतात. वृक्षांवर, सुशोभीकरण केलेल्या परिसरात बॅनरबाजी करणाऱ्यांवर पालिकेने तातडीने कारवाई करावी.
- भूपेश कदम, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Horoscop : उद्या 6 मार्चला 'या' 6 राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी खुशखबर; आर्थिक लाभ संभवतो, नात्याला मिळेल नवी दिशा

SCROLL FOR NEXT