भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : सहकारी कर्मचाऱ्याचा पगार हिसकावून त्याची हत्या करून पळून गेलेल्या संशयित आरोपीला निजामपुरा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे जम्मू आणि काश्मीरमधून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. नीरजकुमार गोपीनाथ विश्वकर्मा (वय ४०, रा. जिल्हा उन्नाव, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे.
४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री गोपीनाथ आणि साबीर अन्सारी हे दोघे शहरानजीकच्या खोणी ग्रामपंचायत परिसरातील एका कारखान्यात काम करीत होते. साबीरने नीरजच्या डोक्यावर हातोड्याने वार करून जखमी केले आणि त्यांच्या पगाराचे पैसे हिसकावून पळून गेला. जखमी नीरजकुमारला उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान १८ फेब्रुवारी रोजी नीरजकुमारचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित आरोपी साबीर रहमतुल्लाह अन्सारी (वर २१, रा. पूर्व चंपारण, बिहार) हा दिल्लीत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक त्याचा शोध घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले, तोपर्यंत तो तेथून पळून गेला होता. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तो नवी दिल्लीहून रेल्वेने जम्मूला गेल्याचे समजले. त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन तपासल्यानंतर अनंतनागमधील लाल चौक येथील बेकरीमधून पोलिसांनी साबीरला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे मोबाईल फोन आणि २९ हजार रुपये रोख जप्त केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.