मोखाडा (बातमीदार) : सरकारने विविध कार्यालयांमध्ये रखडलेल्या कामांचा निपटारा करण्यासाठी मोखाड्यात आमदार आणि खासदारांच्या शुक्रवारी (ता. २८) जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात दाखल करण्याचे आवाहन तहसीलदार मयूर खेंगले यांनी केले आहे. मोखाड्यात शुक्रवारी खासदार डाॅ. हेमंत सवरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या संयुक्त जनता दरबाराचे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तहसीलदार कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्याचे आवाहन खेंगले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.