मुंबई

शिवाजी पार्कवर मनसेचे आज भव्य पुस्तक प्रदर्शन

CD

शिवाजी पार्कवर मनसेचे आज भव्य पुस्तक प्रदर्शन
मराठी भाषादिनी दिग्गजांचे काव्यवाचन
प्रभादेवी, ता. २६ (बातमीदार) : ज्ञानकोषाचे भांडार असलेल्या मराठी भाषेतील अफाट साहित्याच्या भव्य पुस्तकांचे प्रदर्शन दादरच्‍या शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने भरविण्यात येणार असून, दिग्गजांचे कविता वाचनदेखील होणार आहे. मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता शिवाजी पार्क येथे पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात येणार असून, वाचकांना ही पुस्तके पर्वणीच ठरणार आहेत. या वेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सिनेअभिनेता विकी कौशल, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशुतोष गोवारीकर, अभिजित जोशी, शर्वरी वाघ, नागराज मंजुळे, विजय दर्डा, भरत दाभोळकर, गिरीश कुबेर, पराग करंदीकर, राजीव खांडेकर, महेश मांजरेकर, लक्ष्मण उतेकर आदी दिग्गज मान्यवर तसेच स्वतः राज ठाकरे आपल्या आवडीची कविता वाचन करणार आहेत. नामांकित प्रकाशकांची १०५ स्टॉल्सवर पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून, सायंकाळी सहा ते नऊ आणि २८ ते २ मार्च या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी नऊ या वेळेत ती वाचनप्रेमींना चाळायला मिळतील.
आदानप्रदान याअंतर्गत घरातील जुने पुस्तक आणि १० रुपये देऊन कोणतेही पुस्तक वाचकांना कुठलेच मूल्य न देता घेता येणार आहे
याशिवाय येवल्याचे कापसे आणि सोनीची पैठणी कशी विनली जाते हेदेखील पाहायला मिळणार आहे. तर प्रशांत कॉर्नरचे खाद्य पदार्थांचे स्टॉल्सदेखील या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT