मुंबई

अतिक्रमण हटाव मोहिमत दुजाभाव!

CD

रोहा, ता. २६ (बातमीदार) ः नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने रोहा नगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत पालिकेकडून दुजाभाव केला जात असल्‍याचे काही फेरीवाल्‍यांचे म्‍हणणे आहे.
रस्‍त्‍यालगत असलेल्‍या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे, मात्र या अतिक्रमणांवर कारवाई न करता, हातावर पोट असलेले फेरीवाले व फळ, भाजीविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नगरपालिकेकडून दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी स्टॉल आणि गटई कामगारांना स्टॉल देण्यात आले आहेत. तेदेखील हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे पालिका कारवाईदरम्‍यान दुजाभाव करीत असल्‍याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केला आहे.
रोहे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर रानमेवा, फळ, भाजीविक्रेते व्यवसाय करीत असल्‍याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे अर्ज देऊन कारवाईची मागणी केली होती. त्‍याअनुषंगाने मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिस बळ आणि विशेष अतिक्रमण पथकाचा वापर करण्यात आला, मात्र कारवाई करताना नियम धाब्यावर बसवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई न केल्‍याने फळ, भाजी व रानमेवा विकणाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. या कारवाईचा सर्वाधिक फटका आदिवासी समाजातील भगिनी आणि शहर व ग्रामीण भागातून साहित्य विक्रीसाठी येणाऱ्या लाडक्या बहिणींना बसला आहे.

रोहा ः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT