मुंबई

१० कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ केले नष्ट

CD

दहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट
तळोज्‍यातील कंपनीमध्ये शास्त्रोक्त विल्हेवाट; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. दोन वर्षांत जप्त केलेले तब्बल १० कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांची बुधवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून विल्हेवाट लावली.
नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये १४० किलो वजनाचे एमडी, हेरॉइन, कोकेन, गांजा, चरस, अफीम व एलएसडी पेपर आदींसह ५०० किलो गुटख्याचा समावेश आहे. या वेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आणि विविध पोलिस ठाण्याने दोन वर्षांत नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवाया करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडले होते. एमडी, हेरॉइन, कोकेन, गांजा, चरस, अफीम व एलएसडी पेपर यांसारख्या घातक अमली पदार्थांचा तसेच गुटख्याचा यात समावेश होता. नशामुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून बुधवारी ४० गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेले १० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नष्ट करण्यात आले.
तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीतील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा केंद्रात १४० किलो वजनाचे अमली पदार्थ तसेच ५०० किलो गुटख्याचा साठा नष्ट करण्यात आला.

नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई
नवी मुंबई पोलिसांनी २०२३ व २०२४ मध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर तसेच त्याचे सेवन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. तसेच त्यांच्यावर १,१४३ गुन्हे दाखल करून १,७४३ आरोपींना अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून एकूण ५३ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. कारवाईत पोलिसांनी १११ आफ्रिकन नागरिकांनाही अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ३८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याशिवाय पोलिसांनी २०२३ व २०२४ मध्ये नवी मुंबईमध्ये अवैधरीत्या राहत असलेल्या १,१३१ आफ्रिकन व २२४ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. तसेच यातील १,१२८ आफ्रिकन नागरिकांना देशातून हद्दपार करून परत पाठविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT