मुंबई

नवी मुंबईत खान्देश भूषण पुरस्कार प्रदान

CD

नवी मुंबईत खान्देश भूषण पुरस्कार प्रदान

नवी मुंबई, ता. २६ : सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खान्देश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात प्रशासन, पत्रकारिता, आरोग्य, उद्योग, समाजसेवा या क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे, मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे, अंधेरीतील एसपीआयटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. एन. चौधरी, आयआयटी पवईच्या संगणक विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. के. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कारमूर्तींमध्ये ‘सकाळ’ माध्यम समूहाचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट (आयटी) दीपक पाटे, साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माता गिरीश निकम, जीएसटी विभागाचे जॉइंट कमिशनर संजय निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे, ए. सी. पाटील इंजिनिअरींग कॉलेजचे निवृत्त प्राचार्य डॉ. दिलीप बोरसे, पनवेलमधील आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनराज विसपुते, खारघरमधील खान्देश रहिवासी संघाचे अध्यक्ष मधू पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. वैभव भदाणे आदींचा समावेश आहे. या वेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र रौंदळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
सध्याच्या युगात नेटवर्किंगचं महत्त्व खूप आहे. अशा कार्यक्रमांमधूनच जनसंपर्क वाढतो. विविध क्षेत्रातील मान्यवर इथे एकत्र आले. त्याचा फायदा पुढे विधायक कामांसाठी समाजालाच होणार आहे. त्यामुळे असे उपक्रम राबवणे आवश्यकच आहे, असे मत ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT