मुंबई

पालघरनगरीत हर हर शंभो!

CD

वसई, ता. २६ (बातमीदार) : महाशिवरात्रीनिमित्त पालघरनगरीतील लहान-मोठी आकर्षक फुलांनी शिवालये सजली होती. ‘हर हर महादेव...’, ‘बम बम भोले...’चा जयघोष आसमंती घुमत होता. मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. वसई तालुक्यातील तुंगारेश्वर पर्वतावर असलेल्या ऐतिहासिक महादेव मंदिरात हजारो भाविकांनी मंगळवारी (ता. २५) रात्रीपासून रांग लावली होती.

पालघरमधील ठिकठिकाणच्या मंदिरांत जलाभिषेक, भजन, कीर्तन, शिवतांडव यासह धार्मिक कार्यक्रम, तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पांडवकालीन तुंगारेश्वर मंदिर, ईश्वरापुरी आत्मलिंगरेश्वर मंदिर, चक्रेश्वर मंदिर, आठव्या शंकराचार्यांची समाधी असलेले निर्मळ येथील महादेव मंदिर यासह मल्लिनाथ, वृंदावन टेकडी महादेव मंदिर, नागनाथ मंदिर यासह अन्य शिवमंदिरांत भाविकांनी गर्दी केली होती. सारेजण महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले.

मंदिर व आजूबाजूच्या परिसरात कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोरपणे लक्ष देण्यात आले होते. महापालिकेकडूनदेखील त्वरित कचरा उचलण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने पालघरनगरीतील वातावरण भक्तिरसात न्हाऊन गेले असल्याचे पाहावयास मिळाले.

पोलिसांचा बंदोबस्त
तुंगारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी वाहने थांबविण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डोंगरावरचा प्रवास हा पायी चालत भाविकांनी केला. या वेळी ‘हर हर महादेव’चा नारा गुंजत होता. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

परिवहन बसचा आधार
भाविकांना वाहनांची गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी परिवहन सेवेला बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे हजारो भाविकांना महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसचा आधार मिळाला.

जिल्हाधिकारी, माजी आमदारांनी घेतले दर्शन
पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, माजी आमदार क्षितिज ठाकूर, जिल्हा वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष हार्दिक राऊत, वन विभागाचे अधिकारी पी. डी. पाटील यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्तांनी वसई येथील तुंगारेश्वर येथे शिवपिंडीचे दर्शन घेत अभिषेक केला.

भंडाऱ्याचे आयोजन
पालघरमध्ये ठिकठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पायी चालत जाणाऱ्या भाविकांना केळी, संत्री यांसह अन्य फळांचा प्रसाद, तसेच दूधवाटप विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात येत होते.

भाविक मध्यरात्रीपासून दर्शनासाठी येत होते. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्तदेखील होता. ठाणे, मुंबईमधील भाविकांची यंदा मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
- रमेश घोरकना, अध्यक्ष, तुंगारेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT